विहार हॉलिडेज् विषयी

विहार हॉलिडेज्... एक अद्वितीय अनुभव!

आपले रोजचे धकाधकीचे आयुष्य आणि व्यस्त दिनचर्येपासून दूर जाऊन थोडासा बदल आणि विरंगुळ्याचे काही निवांत क्षण अनुभवण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पर्यटन. आपल्या प्रियजनांसोबत व्यतीत केलेले हे अनमोल क्षण चिरकाळ आनंद देणारे ठरतात. देश असो वा परदेश, पर्यटन आपल्याला विविध संस्कृती, भाषा, चालीरीती, परंपरा, खाद्यसंस्कृती, भौगोलिक रचना व इतिहास यांची सुरेख अनुभूती देते. विविध अनुभवातून आपल्याला समृद्ध करणारे हे मुक्त विद्यापीठच जणू! म्हणतात ना, आपले व्यक्तिमत्व बहुआयामी बनविण्यामध्ये पर्यटनाचाही मोठा वाटा असतो...

विविध पर्यटनस्थळी सहलींचा विचार आपण साधारणतः वर्षातून एकदा किंवा दोनदाच करत असतो. सहलींचे नियोजन उत्तम असेल तर त्या अविस्मरणीय बनून जातात. यासाठी आवश्यकता असते ती तज्ज्ञ संयोजकांची. पर्यटन क्षेत्रातील १५ वर्षांचा समृद्ध अनुभव असणार्‍या 'विहार हॉलिडेज'च्या संचालकांद्वारे ग्राहकांच्या सर्व गरजांची पूर्तता होईल याप्रकारे सहलींचे समग्र, सुयोग्य व नेटके नियोजन केले जाते. सहलीदरम्यान आपले वास्तव्य आम्ही वैयक्तिकरित्या पारखून घेतलेल्या स्वच्छ व नीटनेटक्या हॉटेल्समध्ये असेल हे सुनिश्चित केले जाते. आपला प्रवास सुखकर व्हावा यासाठी आमच्याकडून आरामदायक वाहनव्यवस्थाही केली जाते. या वाहनांसाठी अनुभवी व निष्णात ड्रायव्हर्सची नेमणूक केली जाते. एवढेच नाही, तर या ड्रायव्हर्ससह सतत संपर्कात राहणे आणि कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीचे त्वरित निराकरण करणे ही आमची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. आम्ही आमच्या यशाची ग्वाही मोठ्या जाहिरातींद्वारे देत नाही, तर विहार हॉलिडेजची ख्याती आमच्या संतुष्ट ग्राहकांच्या बोलक्या प्रतिक्रियांद्वारे सर्वदूर पोहोचत आहे. विहार हॉलिडेजसह एकदा प्रवासाचा अनुभव घेतल्यावर आपण आजीवन आमच्या परिवाराचे सदस्य बनून जाल याची आम्हाला खात्री आहे.

इंग्लिशमध्ये वाचा

खासियत विहार हॉलिडेजची

रद्द करण्याचे शुल्क नाही

दुर्दैवाने आपल्याला कोणत्याही समस्येमुळे सहल रद्द करणे आवश्यक असेल तर आपण कधीही आपली सहल रद्द करू शकता. यासाठी रद्दीकरण शुल्क लागू नाही.

रहा सदैव कनेक्टेड

आम्ही जाणतो की आपल्याला आपल्या सहलीशी संबंधित अनेक प्रश्न असू शकतात व आपल्या सोयीच्या वेळेत त्यांची उत्तरे मिळणे आपणासाठी आवश्यक आहे. आमच्या २४/७ सेवेद्वारे आपल्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

गुणवत्तेसह कोणतीही तडजोड नाही

उत्तम गुणवत्तेला आपण सर्व नेहेमीच प्राधान्य देतो. आमच्या सेवांचा दर्जा राखताना आम्ही कोणतीही तडजोड करत नाही. आपल्याला कायम सर्वोत्कृष्ट सेवा पुरविण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.

संपूर्णतः ऑनलाइन सपोर्ट

कार्यालयीन वेळेत किंवा तुमच्या मोकळ्या वेळी, दिवसा किंवा सायंकाळी, कोणत्याही वेळी तुमच्या सर्व शंका किंवा प्रश्नांची उत्तरे देण्यास आम्ही नेहेमीच सतर्क आहोत. तुमच्या सोयीच्या वेळेत शंका समाधान व्हावे यासाठी आमच्या ऑनलाइन सपोर्ट सेवेत आपले सदैव स्वागत आहे.

वैयक्तिक सहाय्य

आपला वेळ मौल्यवान आहे आणि आम्ही हे जाणतो. आम्ही वैयक्तिक सहाय्य पुरविण्यास नेहेमीच प्राधान्य देतो. आमची टिम आपल्या अनुकूल वेळेनुसार आपल्या सहाय्यासाठी नेहेमी तयार आहे.

छुपे दर नाहीत

आमच्या सहलींच्या खर्चामध्ये कोणतेही छुपे दर समाविष्ट नाहीत. संपूर्ण पारदर्शक व्यवहारांसह आपल्याला योग्य व पूर्ण खर्चाची माहिती येथे दिली जाते. कोणत्याही शंका-कुशंकांशिवाय आमच्या सेवांचा आनंद घ्या.

सुलभ बुकिंग प्रक्रिया

आमची कोणतीही सहल बुक करणे आहे अगदी सोपे! 'Quick Enquiry' द्वारे विचारणा करा, आमच्याकडून आपल्याशी संपर्क साधला जाईल. तसेच फोनद्वारे संपर्क साधूनही आपण सहल बुक करू शकता.

प्रवासाचे आरामदायक व सोयीस्कर अनेक पर्याय उपलब्ध

आनंदी व आरामदायक प्रवास ही प्रत्येकाची प्राथमिक इच्छा असते. आम्ही तुमच्या सुखकर व मनोरंजक प्रवासासाठी विविध सोयीस्कर पर्याय सुचवितो. या पर्यायांमधून आपण आपली मनपसंत निवड करू शकता.

प्रत्येक टूर बुकिंगवर क्रेडिट पॉईंट्स मिळवा

आम्हाला खात्री आहे, एकदा आमच्यासह प्रवास केल्यानंतर सहलीसाठी तुम्ही नेहेमीच आमची निवड कराल. याचसाठी आम्ही आपल्याला प्रत्येक बुकिंगवर देत आहोत क्रेडिट पॉईंट्स. तुमच्या पुढच्या सहलीसाठी सवलतीच्या रूपात तुम्ही त्यांचा आनंद घेऊ शकता किंवा आम्ही खास आपल्यासाठी आपल्या गरजेनुसार आरामदायी सहलीची आखणी करू.

हॉटेल्स, वाहने, जलपरिभ्रमण आणि पर्यटनस्थळांच्या पूर्णपणे पारखून घेतलेल्या सेवांची खात्री

प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या सर्व सेवांचे पूर्ण परीक्षण केले जाते. म्हणजेच, तुमच्या सहलीमध्ये नयनरम्य पर्यटनस्थळे, दर्जेदार हॉटेल्स, आरामदायक वाहन तसेच जलप्रवासाची शाश्वती. तर मग या आणि पर्यटनाचा मनमुराद आनंद घ्या.

समस्यांचे तत्काळ निराकरण

आपली सहल निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आमची टीम मेहनत घेत असतेच पण त्यातूनही आमच्या नियंत्रणाबाहेर असलेली समस्या उद्भवलीच तर त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी वेळ - काळ न पाहता आम्ही पूर्ण प्रयत्न करतो

सर्व सेवा एकाच छताखाली

आपण जर आमची सहल बुक करत असतात तर आपल्याला रेल्वे तिकीटे (उपलब्ध असल्यास) विमान तिकीटे , व्हिसा, इन्शुरन्स, हॉटेल्स / रिसॉर्ट्स / वाहन - अनुभवी चालकासह अशा सर्व सेवा आम्ही आपल्याला एकाच छताखाली उपलब्ध करून देत असतो. आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बुकिंग करण्याची गरज नाही.

संचालक विहार हॉलिडेज


श्री. संजय वझे

संजय वझे हे उत्तम संवाद कौशल्य, संघ बांधणी, बिझनेस नेटवर्किंग, उत्पादन विकास, मार्केटिंग, ग्राहक संबंध कौशल्य या गुणांची भक्कम पार्श्वभूमी तसेच प्रवास व पर्यटन क्षेत्रातील सुमारे १५ वर्षांचा उत्तम अनुभव असणारे युवा उद्योजक आहेत. तसेच त्यांनी 'केसरी टूर्स' या पर्यटन क्षेत्रातील प्रतिष्ठित व अग्रगण्य कंपनीमध्ये 'ग्रुप लीडर, प्रवास सल्लागार, सहल संयोजक' अशा विविध पदांवर ४ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी कार्याचा अनुभव घेतला आहे. सध्या ते विहार हॉलिडेज् व सारा हॉस्पिटॅलिटी या आपल्या संपूर्ण मालकी हक्काच्या प्रवासी संस्था यशस्वीपणे सांभाळत आहेत. या संस्थांमध्ये ते ९ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी कार्यरत असून देश-विदेशातील सर्व प्रकारचे प्रवासी पॅकेजेस, रिसॉर्ट बुकिंग, तिकिट बुकिंग, सर्व प्रकारच्या सहलींचे आयोजन, ग्राहक संबंध आणि उत्तम गुणवत्तेच्या सेवा पुरविण्यावर त्यांचा भर आहे. त्यांनी स्वतः २२ पेक्षा जास्त देशांचा प्रवास करून पर्यटकांना प्रवासाचा आनंद प्राप्त करून दिला आहे. याशिवाय मुंबई, पुणे, दिल्ली, दुबई, सिंगापूर, मलेशिया, कोलंबो, बँकॉक अशा अनेक ठिकाणी होणार्‍या सेमिनार्समध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. विहार हॉलिडेजमध्ये ते विक्री, विपणन, भविष्यातील सहलींचे नियोजन अशा महत्वाच्या कार्यात लक्ष देत आहेत.
श्री. राजेंद्र जोशी

राजेंद्र जोशी हे विहार हॉलिडेजच्या संचालकांपैकी एक असून ते कंपनीचे पूर्णपणे व्यावसायिक व निष्ठावान सदस्य आहेत. त्यांनी के. सी. कॉलेज, मुंबई येथून पर्यटन व्यवस्थापनामध्ये पदव्युत्तर पदविका व उत्कृष्ट गुणांसह IATA पदवी प्राप्त केली आहे. मागील १४ वर्षांपासून ते पर्यटन क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. याआधी त्यांनी केसरी टूर्स व ई-टूर्स मध्ये अनुक्रमे टूर लीडर व ऑफिस एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले आहे. सध्या ते आपल्या प्रशंसनीय संवाद कौशल्य व व्यवस्थापन कौशल्यासह कंपनीच्या प्रशासकीय तसेच संचालन विभागाचे कामकाज सांभाळत आहेत. त्यांनी भारताच्या विविध प्रदेशात तसेच दक्षिण पूर्व (आग्नेय) आशियाच्या काही भागात प्रवास केला असून मनाली व दुबई ही त्यांना विशेष प्रिय अशी पर्यटनस्थळे आहेत. याबरोबर त्यांनी मुंबई, दिल्ली आणि बेंगलुरू येथे साऊथ एशियन ट्रॅव्हल ट्रेड एक्झिबिशन (SATTE), आऊटबाऊंड ट्रॅव्हल मार्ट (OTM) यांसारख्या ट्रॅव्हल अँड ट्रेड फेअर्समध्ये सहभाग घेतला आहे. गुणवत्ता नियंत्रण, नवे उपक्रम, मूल्य आखणी, प्रशिक्षण व संचालन यांवर त्यांचे विशेष लक्ष आहे.