Lele & Yogi Family
संजय सर अतिशय योग्य वेळी आणि योग्य अशा हंगामात आमची हिमाचल ट्रिप संपन्न झाली. अमृतसर, धर्मशाला, डलहौसी आणि चंदीगढ इथल्या सर्वच हॉटेलमध्ये अगदी सुसज्ज आणि अद्ययावत व्यवस्था होती. तुम्ही नेमून दिलेला ड्रायव्हर सुद्धा अत्यंत धडाडीचा, मितभाषी आणि driving सुद्धा मस्त करत होता. कोरोनाच्या काळात सुद्धा जवळपास सगळीच ठिकाणे बघता आली.. अमृतसरचे सुवर्णमंदिराचे दृश्य तर डोळे दिपवून टाकणारे होते. लॉकडाऊनच्या काळात झालेली पहिली लांबची सफर ही खरंच रंजक आणि अविस्मरणीय ठरली.. इतकी छान व्यवस्था केल्याबद्दल व सुंदर सेवा पुरवल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आणि टीम विहार हॉलिडेजचे खूप कौतुक...आभार मानणार नाही कारण आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात😊शुभेच्छा😊
- Himachal Pradesh Tour