Mr. Anant Acharya
अहमदाबाद पासून आमचा प्रवास सुरु झला. आम्ही सर्व बुकिंग्स "विहार हॉलीडेज्" मार्फ़त करुन घेतले होते. आम्ही पोहचण्यापूर्वीच टेम्पो ट्रैवलर ड्राईवर घेऊन हजर होता. तेथुन आम्ही अतिशय नियोजनपूर्ण आणि सोईस्कर असा प्रवास सुरु केला. प्रथम उदयपुर, जैसलमेर व जोधपुर येथील हॉटेल अतिशय सुंदर होते. तसेच नाश्ता व रात्रीचे जेवण चविष्ट होते. जैसलमेरचे प्रिया होटेल इतर हॉटेल्सच्या मानाने कमी दर्जाचे होते. वाळवंटातील अनुभव हा अतिशय रोमांचक, अविस्मरणीय होता. तेथील अनुभव शब्दात वर्णन करू शकत नाही.
"विहार " ला पुढील वाटचालीसाठी शुभेछा
- Rajasthan Tour