वेगळ्या हिमाचलचे दर्शन
हिमाचल प्रदेशचा विचार जरी केला तरी आपल्या डोळ्यासमोर बर्फाच्छादित पहाड येतात, हिमाचल यासाठी जगात प्रसिद्ध आहेच, पण याशिवाय हिमाचलची ओळख अजून एका गोष्टीसाठी आहे ते म्हणजे सफरचंद !
साधारण जुलैचा शेवटचा आठवडा ते सप्टेंबर अखेरीस पर्यंत हिमाचल बहरतं ते लालचुटूक सफरचंदानी, बाजारपेठा सफरचंदानी ओसंडून वाहत असतात, या भागातून अनेक देशात विशेषतः आखाती देश , श्रीलंका , पाकिस्तान, चीन, ऑस्टेलिया, फिजी या देशात सफरचंदाची निर्यात केली जाते.
एप्रिल ते जून, दिवाळी किंवा नाताळाच्या सुट्ट्या अशा हंगामात आपल्याला सुट्ट्या मिळत नसतील किंवा त्याकाळात शिमला - मनाली येथे जाणे काही कारणामुळे शक्य होत नसेल तर ऑगस्ट - सप्टेंबर या कमी गर्दीच्या हंगामात सफरचंदाने बहरलेली मनाली पाहण्यास चला.
- 2018