विलोभनीय कुमाऊ
उत्तराखंड या राज्यातील नैनिताल, अलमोडा, कौसानी, कॉर्बेट पार्क, बिनसर, पिठोरागड या भाग कुमाऊ म्हणून प्रचलित आहे. हिमालयाचे अत्यंत विलोभनीय दर्शन या भागातून होते जोडीलाच जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे जगातल्या मोठ्या अभयारण्यातील एक अभयारण्य !
५२ शक्तिपीठातील एक अशा नैनादेवीच्या नावाने असलेले तलावांचे हिलस्टेशन म्हणजे नैनिताल ! हिमालयाच्या कुशीतील एक छोटे पण सुंदर शहर. नैनीदेवीचे मंदिर, बोटिंग , हिमालय झू, गंडोला (केबल कार) राईड, सनसेट पॉईंट, सातताल- भीमताल- नौकुचियाताल असे मोठे तलाव, घोडाखाल बेल टेम्पल , जिमकॉर्बेट येथे जंगल सफारी, जंगलवॉक असं भरगच्च स्थलदर्शन असलेली ६ दिवसांची सहल हौशी पर्यटकांना भावते. हनिमून कपल्स देखील या सहलीला पसंती देतात.
- 2018