राजस्थान

राजस्थान

भौगोलिकदृष्ट्या राजस्थान हे भारतातील सगळ्यात मोठे राज्य आहे. प्राचीन नाव राजपुताना. राजस्थानचे मुख्यतः तीन भाग पडतात मेवाड, मारवाड आणि शेखावटी. जयपूर, बिकानेर , जैसलमेर, जोधपूर, आबू, उदयपूर, चितोड, रणथंभोर, पुष्कर, अजमेर ही राजस्थानमधील पर्यटनाच्या दृष्टीने मुख्य ठिकाणे. संपूर्ण राजस्थान पाहण्यासाठी साधारण १२ ते १४ दिवसांचा कालावधी गरजेचा आहे. त्यामुळे आम्ही राजस्थान मेवाड आणि मारवाड अशा दोन भागात दाखवतो.

सप्टेंबर ते फेब्रुवारी हा राजस्थानमधे पर्यटन करण्याचा उत्तम काळ. देशविदेशातून लाखो पर्यटक मरूभूमी अनुभवण्यासाठी येतात. राजस्थानमधे आपल्याला चांगल्या प्रतीची हॉस्पिटॅलिटी म्हणजेच आदरतिथ्य अनुभवायला मिळतं. विहार हॉलिडेज मार्फत आम्ही दरवर्षी शेकडो पर्यटकांना राजपुतान्याचे दर्शन घडवतो. अनेक पर्यटकांना ग्रुप डिपार्चरमधून सहलीला जायचे असते, अशा ग्रुप ट्रिप्सचे अनेक फायदे असतात. अनेक नवीन लोकांशी परिचय होतो, मजा येते आणि मुख्य म्हणेज आपली काळजी घेण्यासाठी पूर्ण सहलीत आमचा अनुभवी सहल संचालक उपलब्ध असतो. त्यामुळे आपण सहल फक्त मनसोक्त एन्जॉय करायची असते.

उदयपूर, चितोडगड , रणथंभोर आणि जयपूर अशा मेवाड भागाची सहल आम्ही १ - ६ फेब्रुवारी २०२० दरम्यान आयोजित केली आहे. सहलीची सुरवात अहमदाबाद येथून होऊन आपण उदयपूर येथे प्रस्थान करणार आहोत. उदयपूर ही मेवाडची राजधानी. येथील भव्य असा सिटी पॅलेस, मोती मगरी, सहलीयो की बाडी आणि अन्य काही महत्वाची स्थलदर्शन करून आपण चितोडमार्गे रणथंभोरकडे मार्गस्थ होतो. चितोडगड हा आपल्या पराक्रमाचे आणि त्यागाचे प्रतीक आहे. शेकडो राजपूत स्त्रियांनी येथे जोहर केला आहे. येथील विजयस्तंभ, मीरा मंदीर पाहून आपण रणथंभोरला पोहोचतो. येथील जंगल सफारीची मजाच वेगळी.. रणथंभोरचा किल्ला आणि त्या जंगलातील वन्यजीवन आपल्याला वेगळ्या विश्वात घेऊन जाते. येथील पक्षी विविधता देखील अफाट आहे. याचा अनुभव घेऊन आपण गुलाबी शहर म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या आणि राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरकडे मार्गस्थ होतो. जयपूर येथील हवामहल, पॅलेस, आमेर फोर्ट, बिर्ला मंदिर इत्यादी ठिकाणे पाहून मनसोक्त शॉपिंग देखील एन्जॉय करतो.

६ दिवसाच्या या सहलीचे शुल्क १९,९०० + ५ % GST प्रतिव्यक्ती इतके आहे (अहमदाबाद ते जयपूर) या शुल्कात निवास, प्रवास, सकाळची न्याहारी, सुग्रास भोजन, सर्व ठिकाणी प्रवेश फी समाविष्ट आहे. अहमदाबाद ते जयपूर या पूर्ण सहलीत आमचा अनुभवी सहल संचालक खास आपल्या सोबत असणार आहे. फॅमिलीतसेच सिनीयर सिटीझन्स यांच्यासाठी ही सहल एक उत्तम पर्याय आहे. सहलीत जागा मर्यादित आहेत तेव्हा आजच आपले ऍडव्हान्स पैसे भरून आपली सीट निश्चित करा.

आमच्यासोबत राजस्थानला चला, इथला इतिहास आपल्याशी संवाद साधण्यास उत्सुक आहे !


- संजय वझे, संचालक, विहार हॉलिडेज

  • 12 December 2019