सौराष्ट्र दर्शन टूर - विश्वविहार हॉलिडेज
दिनांक २१ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या काळात पूर्वनियोजित केलेल्या सौराष्ट्र दर्शन चे अतिशय उत्तम नियोजन करून टूर यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संजय वझे सर आणि संपूर्ण विश्वविहार हॉलिडेजच्या PSP सदस्यांचे अभिनंदन आणि कौतुक..
सध्याच्या लॉकडाऊन आणि कोरोना काळात अनिश्चितता हीच केवळ निश्चित आहे याचा प्रकर्षाने आणि सातत्याने अनुभव येतो आहे. पण अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा सहलीचे बुकिंग सुरू करून सतत आशावादी राहून आणि सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेऊन त्यांनी लॉकडाऊन नंतरची कदाचित (माझ्या माहितीप्रमाणे) पहिली गृप टूर यशस्वी केली.
साधारण मार्च, एप्रिल महिन्यापासूनच बुकिंग्स ना सुरवात झालेली आणि त्या काळात पुन्हा कडक लॉकडाऊन सुरू झालेला, पण वेळेचा योग्य तो अंदाज घेऊन अजिबात घाई न करता अचूक समयी ट्रेन आणि हॉटेल बुक केली. काही दिवस आधीच गुजरातमध्ये पुरसदृश्य परिस्थिती होती. अशी अनेक आव्हाने समोर असून सुद्धा टूर कॅन्सल न करता ती घडवून आणली हे कौतुकास्पद आहे.
मुंबई सेंट्रल स्टेशनला सर्व गेस्टना वेलकम करण्यापासून ते पुन्हा मुंबई सेंट्रल स्टेशन पर्यंत सोडेपर्यंत सगळं व्यवस्थित मॅनेज केलं. वयाची साठी पार केल्यानंतर विशेषतः आत्ताच्या काळात आई वडिलांना एकटं कुठेही लांबच्या ठिकाणी पाठवायचं असलं की मनात थोडीशी धाकधूक असते. पण टूर मॅनेजर म्हणून स्वतः संजय सर च तिथे येणार आहेत हे कळल्यावर अर्ध्याहून अधिक चिंता मिटली होती. सगळ्या ठिकाणचे फोटो जसे की द्वारका, सोरटी सोमनाथ मंदिर, बासुरी व समर्पण मार्केट, जंगल सफारी, गोंडल पॅलेस, तिथल्या विंटेज कार, पोरबंदर, समुद्र किनारा, मोचा हनुमान मंदिर, आफ्रिकन डान्स या सर्वांचा आनंद आम्ही फक्त फोटोमधून घेत होतो. सरांनी निवडलेली हॉटेल्स हे विश्वविहारच्या प्रत्येक टूर मधलं विशेष आकर्षण असतं तसेच तिथला ब्रेकफास्ट व डिनर कायम लाजवाब असतो हे तिरुपती आणि हिमाचल टूर च्या स्वानुभवाने मी इथे सांगू शकतो.
संपूर्ण टूर मध्ये संजय सरांच्या बरोबरीने PSP head ओंकार गोसावी सर आणि लीना कुलकर्णी मॅडम यांनी सुद्धा गेस्ट ना काय हवंय नकोय याची सर्व ती काळजी घेतली. लीना मॅडम यांनी तर अगदी मुलीप्रमाणेच सतत सोबत होत्या. कालच लीना मॅडम यांच्याशी ओळख झाली व संवाद झाला, तेव्हा त्या म्हणाल्या की काका काकू सुद्धा प्रेमळ आहेत आणि मी टूर मॅनेजर असून सुद्धा त्या सतत लीना खाऊन घे! तुझ्यासाठी थांबू का? असं म्हणत माझी मुलीसारखी काळजी घेत होत्या. तेव्हा गजानन महाराज यांच्याच पोथीतली एक ओवी आठवली की "सारखाच भेटे सारख्याशी, विजातीय द्रव्याशी समरसता होणे नसे" त्यामूळे आपण जसे असतो तशीच माणसे आपल्याला सगळीकडे भेटत राहतात.
असं कदाचित पहिल्यांदाच होत असेल की टूर ला न आलेली व्यक्ती अभिप्राय देते आहे. पण विश्वविहार हॉलिडेज तर्फे दोन टूर केल्यामुळे आम्ही सोबत नसलो तरी ही टूर मस्त होईल आणि तसंच झालं तुम्ही सर्वांनी ५२ जणांना ज्या पद्धतीने सांभाळलं, त्यांची काळजी घेतलीत, जबाबदारी आणि कर्तव्य म्हणून नव्हे तर खरच आपलेपणाने तुम्ही हे सगळं केलंत म्हणून मी लेले आणि योगी परिवाराकडून मुद्दाम हा विशेष अभिप्राय देत आहे. टीम विश्वविहार हॉलिडेजला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद !
- आनंद अरुण लेले , कल्याण
- 25 September 2021

 
                                
                                



